Posts

Showing posts from 2019

UP Ahead in Reforms, FPOs may hike Agri-GDP by 10%

Image
Gorakhpur, 29 Dec : Yogesh Thorat on Sunday said that Uttar Pradesh is taking lead for adopting Agriculture Marketing Reforms and organised small & marginal farmer through  FPOs and their engagement in value chains can contribute additional 10 % in Agri-GDP of the state which is presently 26%.  Addressing, NABARD Kisan Samaroh in presence of Chief Minister Yogi Adityanath at Deen Dayal Upadhyay, University Thorat said, “Maharashtra FPCs success has four dimensions i.e. organised small & marginal farmers ;  business models of value addition at village level; Employment generation in value chain  and Bringing Investment in the sector. As a result FPCs in the state are showing good performance in the country.” He congratulated the CM Yogi Adityanath for keeping FPOs at the Center stage in agriculture marketing reforms and further requested him to delink Market Cess from the APMC for promoting investment in Agriculture Marketing. He further said, “F...

पीपीपी- आयएडी कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निविदा सूचना जाहीर

Image
पुणे, २० कांदा साठवणूक ( १००० मे. टन ) व पणन सुविधा ( ग्रेडिंग शेड व ५० टन वजनकाटा ) उभारणीसाठी महा ओनियन ( नाफेड- महाएफपीसी संयुक्त भागीदारी प्रकल्प )  मार्फत निविदा मागविल्या असून कागदपत्रे निविदा कागदपत्रे  http://www.mahafpc.org/Tender_Document.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. सामायिक सुविधा शेड,  कांदा साठवणूक चाळ बॉक्स व वजनकाटा या तिन्ही घटकांसाठी एकत्रिपणे किंवा स्वतंत्रपणे निविदा भरू शकतात. तसेच अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील १६ शेतकरी कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर प्रकल्प उभारणीसाठी तीन क्लस्टर करण्यात आले असून कंत्राटदार किमान एक किंवा अधिक क्लस्टर साठी निविदा भरू शकतो. इच्छुक पात्र संस्थांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २७.१२. २०१९ पर्यंत  महाएफपीसी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून निविदा सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. 

संस्थांच्या बळकटीकरणासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्ये आवश्यक : महाएफपीसी

Image
पुणे, १३ डिसें. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेमध्ये सुरु असणाऱ्या सहकार कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी कंपनी प्रशिक्षण दरम्यान महाएफपीसीच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि संस्थांच्या बळकटीकरणासाठी  व व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्ये आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. 

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

Image
लातूर, १२ डिसें. लातूर मधील हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केलेल्या १४ शेतकरी कंपन्यांची लातूर येथे बैठक पार पडली असून सध्या सोयाबीनचे बाजारभाव हमीभापेक्षा अधिक असल्याने कंपन्यांनी बाजारभावाने सोयाबीन खरेदी करून प्रक्रियादारांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. 

शेतकरी कंपन्यांमार्फत १०,००० क्विंटल सोयाबीनचा थेट प्रक्रियादारांना पुरवठा

Image
पुणे, ता. ११ डिसें. : महाएफपीसीच्या पुढाकारातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांमार्फत आजपर्यंत १०,००० क्विंटल सोयाबीनची खरेदी करून सोयाबीन प्रक्रिया करणाऱ्या कार्पोरेट प्रक्रियादारांना पुरवठा करण्यात आला आहे. कंपन्यांनी हमीभाव खरेदी केंद्रे देखील सुरु केली होती परंतु बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असल्याने तसेच एफएक्यू दर्जा नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून प्रक्रियादारांशी खरेदी सुरु केल्याने शेतकऱ्यांना कंपनी स्तरावरच बाजारसुविधा उपलब्ध झाली आहे. 

इस्लामपूरला शेतकरी कंपन्यांची शनिवारी पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक

Image
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बैठकीचे आयोजन दि.  ७/१२/२०१९  रोजी हॉटेल भैरवनाथ (खानावळ), डांगे पेट्रोल पंपा शेजारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती जवळ, इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली येथे दुपारी १२ वाजता मिटिंग चे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी महाएफपीसी चे अध्यक्ष योगेश थोरात व इतर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फ़त हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे, खत व चहा विक्रीसाठी डिलरशिप देणे,सोयाबीन व डाळींचा खासगी व्यापार,  शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अडचणी, नवीन व्यावसायिक संधी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन   रामराव पाटील (  7768065707  ) सुभाष पाटील ( 9403780147  )यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाएफपीसी कार्यालयाशी संपर्क साधावा  (प्लॉट नं. ६२४, नाफेड बिल्डींग, मार्केट यार्ड, पुणे – ३७ संपर्क क्र – 020 24272827 ,  वैभव-  8600908809 )

विदर्भातील शेतकरी कंपन्या करणार धान खरेदी

Image
अमरावती, २३ नोव्हे. महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा अमरावती येथे पार पडली. यावेळी अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा जिल्ह्यातील  खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा,चंद्रपूर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे. यावेळी महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, सुधीर इंगळे, अक्षय जायले, डॉ. गणेश खारकर मनोहर सुने, स्वनिल ढोले, तुषार खारकर, नाफेड चे अधिकरी नितिन सुक्रे आणि विदर्भातील ८१ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

शेतकरी कंपन्यांनी शेतमालाच्या विक्रीसाठी संघटित व्हावे : महाएफपीसी

Image
नाशिक, २२ नोव्हे. : कृषीथॉन या शेतीविषयक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित महा-खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ  सानप यांनी राज्यातील शेतकरी कंपन्यांनी महाएफपीसीच्या माध्यमातून संघटित होऊन आपली बाजारात ताकद दाखविणे आवश्यक आहे व यासाठी एकत्रितपणे मूल्यवर्धन करून शेतमालाची विक्री करावी असे आवाहन केले

शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी आढावा बैठक संपन्न

Image
औरंगाबाद : महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा बैठक कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे पार पडली. यावेळी अहमदनगर, पुणे, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे. 

महाएफपीसी ची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (१४ नोव्हेंबर )

Image
पुणे, १२ सप्टें: महा एफपीसी ची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर  २०१९ रोजी पुणे मर्चंट चेंबर, गुलटेकडी,मार्केट यार्ड, पुणे येथे सकाळी ११:०० वाजता होणार आहे. आचारसंहितेच्या कारणास्तव महा एफपीसी ला रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली होती.

MAHAFPC - AHA workshop for Strengthening FPCs starts

Image
Pune, 6 Nov : Two days international workshop has been organised by Bonn ( Germany )  based German farmer Associations training institute  Andreas Hermes Akademie (AHA) and MAHAFPC at Pune. A selected group of 15 persons including Board members, Management Team of MAHAFPC & FPC leaders are part of this brainstorming session.  AHA trainers Poorvi Shah- Palouni and Norbert Grobbel will coordinate the session. This workshop will chalk out the further action for collaborative work for organisation development of MAHAFPC as well as farmer producer companies in the state of Maharashtra. 

राज्यात १० लाख टन सोयाबीन हमीभाव खरेदीचा लक्ष्यांक

Image
पुणे : केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १० लाख टन सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक मंजूर केला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठीं जोरदार तयारी केली आहे. राज्यात पावसामुळे सोयाबीन पिकाचे २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. कमी उत्पादनामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे. मात्र बाजारात बाजारभाव वाढीचा फारसा कल दिसून येत नाही. तरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व बाजारभावामधील चढ   उताराचा धोका धोका कमी करण्यासाठी  हमीभाव खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी असे आवाहन महाएफपीसी मार्फत करण्यात येत आहे. 

दीपावली स्नेहमेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांचे नवसंकल्प

Image
जळगाव: ता. २६ जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून स्नेहमेळाव्याचे आयोजन  करून  शेतकरी कंपन्यांच्या क्षमता बांधणीचा अनोखा उपक्रम साकारला आहे. यावेळी जिल्ह्यातील १७ शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुषार पाटील , गोकुळ पाटील , निलेश पाटील व  महाएफपीसीचे प्रशांत पवार  यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन   केले होते. 

मूग, उडीद व सोयाबीन खरेदी नोंदणी १५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार

Image
पुणे: २६, राज्य शासनाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी नोंदणी साठी १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याने हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे सुलभ होणार आहे. 

मार्च २०२० अखेरीस शेतकरी कंपन्यांद्वारे २५ हजार टनाचे कांदा स्टोअरेज ग्रीड उभारणार : संजीवकुमार चड्ढा

Image
पुणे : १९ ऑक्टोबर, राज्य सरकारने नाफेड -महाएफपीसी व शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा संयुक्त भागीदारी असणारा २४ कोटी रुपयांच्या कांदा साठवणूक व पणन प्रकल्पास मंजुरी दिली आहे. यामध्ये राज्य शासन ५० टक्के गुंतवणूक करत असून शेतकरी कंपन्या व नाफेड उर्वरित गुंतवणूक करत आहेत. सदर प्रकल्पाच्या द्वारे देशात कांद्याची बफर  साठा साठवणूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभी राहणार आहे. तसेच शेतकरी कंपन्यांना व्यावसायिक संधी मिळणार आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान पुणे येथे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चड्ढा यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत झालेल्या कांदा खरेदीचा आढावा घेण्यात आला. कांदा साठवणुकीमधील नुकसान टाळण्यासाठी या स्टोअरेज ग्रीडचा मोठा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सदर प्रकल्पात पहिल्या टप्यात ७ कंपन्यांचे करार झाले असून उर्वरित कंपन्यांची निवडप्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यात येणार आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान  परिषदेने या प्रकल्पात तांत्रिक सल्लगार म्हणून काम करण्यास तत्वतः मंजुरी दिल्याने राष्ट्रीय कांदा, लसूण स...

महाएफपीसी मार्फत हमीभाव खरेदीचे चुकारे तीन दिवसांत शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात.

Image
पुणे : १८ ऑक्टोबर, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर मुगाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यास सुरुवात केली आहे. साधारपणे खरेदी केलेला शेतमाल गोदामांमध्ये गेल्यापासून साधारणपणे ३ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे पेमेंट थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या बँक खात्याची बिनचूक माहिती खरेदी केंद्रांवर जमा करावी असे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात महाएफपीसी मार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट करण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने या कामी सुसुत्रता आली आहे.  हमीभाव खरेदीचे उशिरा चुकारे होण्याच्या कारणास्तव या योजनेस शेतकरी म्हणावा असा प्रतिसाद देत नाहीत. असा शेतकऱ्यांचा समज होता परंतु यंदा मात्र अशी वस्तुस्तिथी नाही हे सिद्ध झाले आहे  त्यामुळे शेतकऱ्यांनी  या वर्षी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करून बाजारभावापेक्षा शेतमालाचे दर कमी असल्यास हमीभाव खरेदी क...

शेतकरी कंपन्यांच्या १०,००० सभासदांची मूग, उडीद, सोयाबीन हमीभाव खरेदी साठी नोंदणी

Image
पुणे ता. १३, राज्यात  उत्पादक कंपन्यांमार्फत १७  जिल्ह्यांमधील १०५ शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली असून पहिल्या टप्यात  मूग,उडीद व सोयाबीन या पिकांच्या हमीभावाने विक्रीसाठी १०,००० सभासद शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून प्रत्यक्ष खरेदीला देखील सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातील कंपन्यांनी  नोंदणी प्रक्रियेत  आघाडी घेतली असून २३१३ शेतकरी नोंदणीकृत झाले आहेत. त्यापाठोपाठ हिंगोली (१४००), बीड (११२४), परभणी ( १०५२) या जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची नियोजनबद्धरित्या प्रचार व प्रसिद्धी केली असून शेतकऱ्यांनी देखील नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातुलनेत अमरावती, वाशीम व जळगाव जिल्ह्यात मात्र शेतकरी कंपन्यांकडून समाधानकारक कामगिरी होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच बाजारात सोयाबीनचे दर घसरत चालल्याने आणि सोयाबीन नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याने पुढील आठवड्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करतील व वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  शेतकऱ्यांनी लवकरात  कंपन्...

महाएफपीसीची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ४५ दिवसांची मुदतवाढ

Image
पुणे, ता. २९ राज्य शासनाची अभिकर्ता संस्था म्हणून राज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होऊ नये यासाठी  महाएफपीसीने कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील रजिस्ट्रार ऑफ कंपनी यांचेकडे सर्वसाधारण सभा राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर घेण्याची विनंती केली होती. यानुसार रजिस्ट्रार ऑफ कंपनी यांचेकडून ४५ दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश निर्गमित करण्यात  आले आहेत. महाएफपीसीची  वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची ३० सप्टेंबर हि अंतिम मुदत होती. परंतु महाएफपीसीची शासनाची हमीभाव योजनेअंतर्गत कडधान्ये व तेलबिया खरेदीसाठी राज्य स्तरीय अभिकर्ता संस्था असल्याने  आचारसंहितेचा भंग तसेच मूग, उडीद व सोयाबीन खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये या कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपनी कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ६  महिन्यांच्या आत कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. जास्तीतजास्त ३ महिन्याची मुदतवाढ मिळू शकते तसेच दोन सर्वसाधारण सभांमधील कालावधी १५ महिन्यांपेक्षा अधिक असू नये अशी तरतूद आहे. सर्वसाधारण सभे...

शेतकरी कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी बाबत जनजागृतीसाठी शेतकरी मेळावे व घोंगडी बैठका सुरु

Image
नांदेड, ता. १३ सप्टें : किनवट तालुक्यातील मांडवा गावात किनवट तालुका शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत महाएफपीसी मार्फत होणाऱ्या हमीभाव खरेदीबाबत शेतकरी जनजागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

१५ सप्टें पासून शेतकरी कंपन्यांमार्फत मुग , उडीद व सोयाबीन हमीभाव खरेदी नोंदणी सुरु

Image
https://indianexpress.com/article/cities/pune/mahafpc-to-commence-price-support-scheme-operations-from-september-15-5987599/

धुळे जिल्ह्यात प्रथमच होणार शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी

Image
धुळे, ता. ५ सप्टेंबर धुळे जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत PSS खरेदी नियोजन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, सिंदखेडा तालुक्यांत मुगाचा पेरा  असल्याने हमीभाव खरेदी शक्य आहे. यावेळी ७ शेतकरी कंपन्यांचे पदाधिकारी, कृषी विज्ञान केंद्र समन्वयक व महाएफपीसी प्रतिनिधी उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांची PSS खरेदी नियोजन बैठक संपन्न

Image
अमरावती, ता. ३ सप्टें : PSS  खरेदीच्या निमित्ताने टाटा ट्रस्ट यांच्या सुखी बळीराजा प्रकल्प कार्यालयात अमरावती जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक पार पडली असून जिल्हास्तरीय नियोजन पूर्ण झाले आहे. 

शेतकरी कंपन्यांमार्फत ४००० कांदा उत्पादकांच्या माध्यमातून होणार एकाच वाणाचे उत्पादन

Image
नाशिक, ता. ४ सप्टें : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी  आणि त्याचबरोबर बाजारामध्ये एकाच पद्धतीचा कांद्याचा ब्रँड करण्यासाठी महाएफपीसी द्वारे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत असून सात जिल्ह्यांमधील ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सुमारे ४००० सभासद शेतकऱ्यांना एकाच वाणाचे उच्च गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यात येणार आहे. एनएचआरडीएफ ‘सिलेक्शन’ पद्धतीने संशोधित रेड-३ ( L - ६५२) या कांदा बियाणांचे २०० कांदा उत्पादक गावांमधील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. सदर जातीमध्ये पायरुव्हिक ऍसिड व टीएसएस यांचे प्रमाण अधिक असल्याने साठवणूक क्षमता चांगली असून हेक्टरी उत्पादकता ३५-४० टन इतकी आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना खत व औषधे यांचे देखील नियोजन देण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. 

FPC - Corporate Partnership will be helpful for assuring MSP to oilseeds under PPSS

Image
YOGESH THORAT  Pradhanmantri Annadata Aay Suraksha Abhiyan (PMAASHA) announced by cabinet of the GOI, as a umbrella scheme for assuring MSP to the farmers. This scheme has been made as a combo pack of regular scheme of support prices and pilots conducted by some states as well  pilots to be conducted. It basically comprises of three sub  schemes called Price Support Scheme (PSS), Price Deficiency Payment Scheme (PDP) and Pilot on Private Procurement and Stockist Scheme (PPSS). In the present  turbulence of  macroeconomy, primary sector should be safeguarded through proper measures to avoid further damage to the agrarian economy. As per the latest reports of the CSO, Agri GDP has been sliding since the beginning of 2018-19. Therefore, over the period of time, Central government need to focus on the stabilising agriculture markets through various market intervention schemes. The key interventions include implementation of the Price Support Scheme effecti...

अहमदनगर जिल्हा शेतकरी कंपन्यांची हमीभाव बैठक संपन्न

Image
कृषी विद्यापीठ, राहुरी , २८ ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेड पदाधिकाऱ्यांसोबत कांदा विषयाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे PSS खरेदीच्या बाबत चर्चा व नियोजन झाले. 

अकोल्यात मूग व उडिदाची अनुक्रमे १००० मे टन व १५०० मे. टन खरेदी अधिक होणार

Image
तेल्हारा (अकोला) २९ ऑगस्ट : अकोला जिल्ह्यात हमीभाव खरेदीचे नियोजन करण्यासाठी शिवार्पण शेतकरी उत्पादक कंपनी च्या कार्यक्षेत्रावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीनिहाय कार्यक्षेत्र निश्चित करून शेतकऱ्यांपर्यंत  अधिक चांगल्या पद्धतीने योजना पोहोचविण्यासाठी नियोज़न करण्यात आले आहे. 

हिंगोलीमध्ये शेतकरी कंपन्यांमार्फत PSS खरेदीला उत्स्फूर्त सहभाग

Image
हिंगोली, २८ ऑगस्ट , शेतकरी कंपन्यांनी  PSS खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी नियोजनाला सुरुवात केली आहे. 

PSS खरेदी साठी प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ : महाएफपीसी

Image
पुणे, २८ ऑगस्ट : शेतकरी कंपन्यांची मागणी लक्षात घेऊन PSS खरेदी साठी कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत असल्याची माहिती महाएफपीसी द्वारे देण्यात आली आहे.

बुलढाण्यात शेतकरी कंपन्यांचे २८०० मे. टन मूग, २६०० मे . टन उडीद खरेदीचे उद्दिष्ट्य

Image
बुलढाणा , २८ ऑगस्ट : जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी महाएफपीसी अंतर्गत PSS  खरेदी करण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी   २८ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

१५ सप्टेंबर पासून मूग , उडीद व १ ऑक्टोबर पासून सोयाबीन PSS खरेदी नोंदणी सुरु होणार

Image
औरंगाबाद ता. २६ खरीप हंगामात यंदाच्या वर्षी पावसाची परिस्थिती राज्यात कमी अधिक प्रमाणात असल्याने पिकांचे उत्पादन व उत्पादकता यावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच बाजारामधील मंदीचे सावट  लक्षात घेता उत्पादित झालेल्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्याची देखील फारशी शाश्वतता नसल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हमीभाव योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची पर्यायी विक्री देखील उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यक्ता आहे. याच उद्देशाने महाएफपीसी माफ डाळी  व तेलबिया खरेदीसाठी औरंगाबाद येथील शेतकरी कंपन्यांची कंपन्यांची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात बैठक संपन्न झाली. 

परभणी मध्ये शेतकरी कंपन्यांमार्फत ७५०० क्विंटल मूग व उडीद खरेदीचे उद्दिष्ट्य

Image
बोरी, ता. २५ ऑगस्ट, परभणी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची पीएसएस खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, वर्ण ( ता. जिंतूर) येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेलू, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, मानवत, पालम या मूग व उडीद उत्पादक तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती विचारात घेऊन खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत  निर्णय घेण्यात आला  आहे. साधारपणे सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ७५०० क्विंटल खरेदीची शक्यता आहे. बिगर सभासद शेतकरी उत्पादकांना खरेदी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी उत्पादक कंपन्यांचे सभासद करून घेण्यासाठी जिल्हास्तरीय अभियान घेण्यात येणार आहे. 

शेतकरी हितासाठी कार्पोरेट क्षेत्राने शेतकरी संस्थांशी भागीदारी करावी :सुभाष देसाई

Image
मुंबई, ता.२३ ऑगस्ट : शेतीच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी कार्पोरेट क्षेत्र व शेतकरी कंपन्या यांची भागीदारी गरजेची असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी इंडियन मर्चंट चेंबर येथे आयोजित चर्चासत्रात केले. उद्योगमंत्रांच्या संकल्पनेतून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी उद्योग व शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बीड मधील शेतकरी कंपन्यांचा आदर्शवत हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याचा संकल्प

Image
बोरखेड ( पाटोदा, बीड )  ता. २४ ऑगस्ट : हमीभाव खरेदी केंद्रे सुरु  करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड  मधील  शेतकरी उत्पादक कंपन्या सज्ज झाल्या असून त्यांनी राज्यात पारदर्शक व शेतकरी केंद्रित हमीभाव खरेदी चा राज्यात आदर्शवत असा ‘बीड पॅटर्न’ निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. येत्या खरीप हंगामामधील हमीभाव खरेदी सुरु होत असल्याने महाएफपीसी मार्फत राज्यभर जिल्हानिहाय नियोजन बैठका सुरु आहेत. बीड जिल्यातील कंपन्यांची बैठक बोरखेड ( ता. पाटोदा  ) येथे नुकतीच पार पडली. यावेळी ७ तालुकयांमधील १७ शेतकरी उत्पादक कंपन्या उपस्थित होत्या.

पीएम- आशा अंतर्गत सोयाबीन हमीभाव पथदर्शी प्रकल्पासाठी शेतकरी कंपन्यांची तयारी सुरु

Image
लातूर, ता. २१ केंद्र शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न अभियान ( पी एम -आशा ) अंतर्गत हमीभाव योजनांची पुर्नरचना केली असून तेलबियांसाठी खाजगी खरेदी व साठवणूक योजनेअंतर्गत (पीपीएसएस)  देशात  ८ पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून  महाएफपीसी मार्फत लातूर  जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प   राबविण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. या योजनेची शेतकरी कंपन्यांना माहिती देण्यासाठी लातूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

शेतकरी कंपन्यांमार्फत मूग, उडीद, सोयाबीन हमीभाब खरेदी केंद्रे सुरु होणार : महाएफपीसी

Image
मुंबई : २१ ऑगस्ट हमीभाव खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी केंद्रे सुरु होणार आहेत.   राज्य शासनाने महा एफपीसी ला अभिकर्ता    संस्थेचा दर्जा दिल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांचा हमीभाब खरेदीचा मार्ग खुला झाला आहे. मंत्रालयात पणन सचिवांच्या दालनात नियोजनाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक  पार पडली. यावेळी महाएफपीसी, महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ फेडरेशन चे पदाधिकारी उपस्थित होते. महाएफपीसी  मार्फत यासाठी नियोजन सुरु झाले असून जिल्हानिहाय पूर्वतयारी बैठका सुरु झाल्या आहेत. लातूर येथे पहिली बैठक संपन्न  झाली असून सुमारे ७० ‘कंपन्यांनी खरेदीसाठी तयारी दर्शविली आहे. इच्छुक संस्थांनी महाएफपीसी कार्यालयात ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा

महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री

Image
पुणे, ६ ऑगस्ट : महा एफपीसी च्या पुढाकारातून महा ओनियन  उपक्रमाअंतर्गत शेतकरी कंपन्यांनी रिटेल कांदा  विक्री सुरु केली आहे. पहिल्या टप्यात सिंहगड रोड व गुलटेकडी परिसरात किरकोळ विक्रीची दुकाने व किरकोळ विक्रेते यांच्या मार्फत कांदा  विक्री सुरु असून लवकरच पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात थेट ग्राहकांना कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

Yogesh Thorat on Agriculture Marketing

Image

वखार पावती तारण कर्ज व्याजदर सवलतीसाठी नाबार्ड केंद्राकडे पाठपुरावा करणार

Image
मुंबई : ९ जुलै, शेतकरी कंपन्यांना वखार पावती धान्य तारण योजनेत नाबार्ड केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती नाबार्ड चे अध्यक्ष डॉ. हर्ष कुमार भानवाला यांनी महाएफपीसी सोबत झालेल्या बैठकीत दिली.  नाबार्ड मुख्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी कंपन्यांना प्रामुख्याने सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्याबाबत  चर्चा करण्यात आली. यावेळी नॅबकिसान च्या द्वारे नवीन वित्तीय उत्पादने करण्याबाबत डॉ. भानवाला यांनी सूचित केले आहे.

सोयाबीन उत्पादकांना हमीभाव देण्यासाठी शेतकरी कंपन्यांची तयारी सुरु

Image
लातूर, ६ जुलै: केंद्र शासनाने सोयाबीनच्या हमीभावात भरघोस वाढ केल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरीप हंगाम २०१९ साठी नियोजन सुरु केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा व अर्थसंकल्पीय तरतुदींचा तसेच देशांर्तगत / आंतरराष्ट्रीय बाजारांचा आढावा घेऊन कंपन्यांनी नियोजनाला सुरुवात  केली आहे. या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक लातूर येथे पार पडली असून पुढील दोन दिवसात PMAASHA अंतर्गत  पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी महसूल मंडळ निहाय खरेही केंद्र सुरु करण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे. 

Budget 2019 will help to create FPOs agribusiness Ecosystem

Image
Pune : 5July MAHAFPC has satisfied over the budgetary announcement for the promotion and development of FPOs, said Yogesh Thorat.  Union budget highlighted to form the farmer producer Organisations for the agricultural development. This will help to create ecosystem for rebooting the growth of business of FPOs. Presently, FPOs are facing the problem of conducive business environment. However today’s announcement will be explored by value chain stakeholders like financial institutions, Retail Organisations, private sector, food processors etc.   it was also demand of FPOs to raise funds from the stock exchanges. Electronic Stock exchanges platform called Social stock exchange has been proposed in the budget. It may be good opportunity for FPOs to be listed on these platform to raise capital for equity, debt or as like  mutual fund for value chain development. Also, support for Non Banking Financial Companies will help to promote collateral free value chain financi...

Count Down Union Budget 2019

Image

FPCs meet for deciding strategy for Disposal Plan of stored Onion

Image
Pune 1 July : MAHAFPC has procured 25,000 MT of Onion directly from Farmers through Farmer producer companies under PSF. As per the directions of NAFED, FPCs meet at Pune to prepare a comprehensive plan to reduce the losses in supply chain.

शेतकरी कंपन्यांचा लातूर येथे खरीप २०१९ मेळावा संपन्न

Image
लातूर , २२ मे : स्पर्धाक्षम   बाजार घटक म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्वतंत्र पणन व्यवस्था उभी करण्यासाठी महाएफपीसी व लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या पुढाकारातून लातूर येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर डाळी व सोयाबीन या पिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लातूर   जिल्ह्यातील ९१   शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगाम २०१९ च्या नियोजनाची महत्वपूर्ण बैठक लातूर येथे पार पडली .  या बैठकीसाठी महाएफपीसी चे अध्यक्ष योगेश थोरात , लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे मोहन भिसे , बबन भोसले , लालासाहेब देशमुख , विलास उफाडे व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते . 

महा- ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची १ लाख क्विंटल कांदा खरेदी

Image
पुणे, ता. १४: नाफेड व महा एफ पी सी यांचा संयुक्त भागीदारी प्रकल्प असणाऱ्या महा ओनियन मार्फत राज्यातील ३४ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण योजने अंतर्गत १ लाख क्विंटल कांदा खरेदी पूर्ण करून खरेदीचा उच्चांक केला आहे. आणखी १  लाख क्विंटल कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सदर खरेदी मुळे बाजारभाव स्थिर राहिले आहेत.

शेतकरी  कंपन्यांची मुल्यवर्धन साखळीत एप्रिल मध्ये ११९०० मनुष्य दिवस  रोजगार निर्मिती 

Image
पुणे, ५ मे : राज्यात दुष्काळाचे मोठे सावट असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ग्रामीण भागातील शेतमजुरांना रोजगारउपलब्ध करून देऊन मोठा दिलासा दिला आहे. साधारणपणे दररोज ७००  लोकांना कांदा प्रतवारी, हाताळणी,, साठवणूक हमाली  आदी मुल्यवर्धन कामांमध्ये रोजगार निर्मिती करून दिली जात आहे. महा ओनीयन या  नाफेड - महा एफ पीसी यांच्या संयुक्त भागीदारी प्रकल्पा मार्फत राज्यात किंमत स्थिरीकरण योजने अंतर्गत  २७ शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत गेल्या महिनभरापासून कांदा खरेदी सुरू आहे. कांदा खरेदी करताना प्रतवारी महत्त्वाची असून या कामासाठी कौशल्य असणाऱ्या मजुरांना प्राधान्य मिळते. यासाठी शेतकरी कंपन्यांनी प्रतवारी करण्यासाठी मजुरांना प्रशिक्षित केले असून तेच मजूर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याची हाताळणी करत आहेत. यामुळे   शेतकरी देखील याबाबत जागरूक होत असून त्यांची मुल्यवर्धनात क्षमता बांधणी होत आहे. आदर्श ग्रामीण अँग्रो प्रो.कं.लि.पिंप्री लौकी.ता.संगमनेर संपुर्ण  कंपनी मार्फत गत महिन्यात ५०००  क्विंटल कांदा खरेदी केली आहे. कंपनीचे संचालक दिलीप लावर...

शेतकरी कंपन्यांमार्फत भागधारक शेतकऱ्यांच्या हमीभाव खरेदी साठी नोंदणी सुरू

Image
वाशीम , २० मार्च  : रमेश जिजेबा गायकवाड या बाळनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. बाळ खेड (ता.रिसोड) च्या भागधारक शेतकऱ्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत  होणाऱ्या हमीभाव खरेदीसाठी प्रथम नोंदणी करणारा शेतकरी म्हणून बहुमान पटकाविला आहे. आजपासून महाएफपीसी या राज्य अभिकर्ता संस्थेच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर हरभरा  हमीभाव खरेदी साठी नोंदणी सुरू झाली आहे. महाएफपीसी मार्फत होणारी खरेदी ही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासद शेतकऱ्यांसाठी होणार आहे. त्यामुळे बिगर सभासद शेतकऱ्यांना शेतकरी कंपनीचे भागधारक असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एफ ए क्यू दर्जाचा शेतमाल तयार करून देण्यासाठी कंपनी स्तरावर धान्य स्वच्छता व प्रतवारी सुविधा उपलब्ध असणार आहे.  नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमाल ' प्रथम नोंदणी प्रथम संधी' (FIFO)  या तत्वाने खरेदी साठी कंपनी यार्डावर  बोलाविण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती एस एम एस द्वारे दिली जाणार आहे. तसेच खरेदी ही सदर विभागासाठी कृषी विभागाने निर्धारित केलेल्या उत्पादकतेनुसार होणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ऑनलाईन ...

FPCs will be roped in PSS Procurement through MAHAFPC as SLA

Image
Mumbai : 1 Mar,  Co-operation and Marketing minister Subhash Deshmukh has given his nod for the proposal of announcement of MAHAFPC, apex organisation of the farmer producer companies as state level agency (SLA). This announcement has cleared the entry of FPCs for the price support scheme (PSS) procurement of Pulses i.e, Tur & gram for upcoming rabi marketing season (RMS). MAHAFPC has experience of pulses and onion procurement under price stabilisation scheme through SFAC & NAFED respectively. However, MAHAFPC was awaiting the decision of the state to announce it as SLA since last two years. Due to some ambiguity in assigning role to  FPCs ; decision was pending. In the previous RMS season, GoM issued a GR to assign role of cleaning and grading for preparation of FAQ (Fair and Average Quality) of commodity in PSS as a service provider. This mechanism did not pick-up engagement of FPCs in PSS. Even, MAHAFPC opted for judicial activism to take the decision on M...