सोयाबीन उत्पादकांना हमीभाव देण्यासाठी शेतकरी कंपन्यांची तयारी सुरु
लातूर, ६ जुलै: केंद्र शासनाने सोयाबीनच्या हमीभावात भरघोस वाढ केल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरीप हंगाम २०१९ साठी नियोजन सुरु केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा व अर्थसंकल्पीय तरतुदींचा तसेच देशांर्तगत / आंतरराष्ट्रीय बाजारांचा आढावा घेऊन कंपन्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक लातूर येथे पार पडली असून पुढील दोन दिवसात PMAASHA अंतर्गत पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी महसूल मंडळ निहाय खरेही केंद्र सुरु करण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे.
Comments
Post a Comment