विदर्भातील शेतकरी कंपन्या करणार धान खरेदी



अमरावती, २३ नोव्हे. महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा अमरावती येथे पार पडली. यावेळी अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा जिल्ह्यातील  खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा,चंद्रपूर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे.

यावेळी महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, सुधीर इंगळे, अक्षय जायले, डॉ. गणेश खारकर मनोहर सुने, स्वनिल ढोले, तुषार खारकर, नाफेड चे अधिकरी नितिन सुक्रे आणि विदर्भातील ८१ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

Shift from Investment in Capital Assets to Subsidies to Agribusiness is Good Move: Yogesh Thorat