इस्लामपूरला शेतकरी कंपन्यांची शनिवारी पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बैठकीचे आयोजन दि. ७/१२/२०१९ रोजी हॉटेल भैरवनाथ (खानावळ), डांगे पेट्रोल पंपा शेजारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती जवळ, इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली येथे दुपारी १२ वाजता मिटिंग चे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी महाएफपीसी चे अध्यक्ष योगेश थोरात व इतर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फ़त हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे, खत व चहा विक्रीसाठी डिलरशिप देणे,सोयाबीन व डाळींचा खासगी व्यापार, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अडचणी, नवीन व्यावसायिक संधी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन रामराव पाटील ( 7768065707 ) सुभाष पाटील (9403780147 )यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाएफपीसी कार्यालयाशी संपर्क साधावा (प्लॉट नं. ६२४, नाफेड बिल्डींग, मार्केट यार्ड, पुणे – ३७
संपर्क क्र –020 24272827, वैभव- 8600908809)
सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार!!!!!
ReplyDeleteआमचे कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतील FPO करीता बैठकी दरम्यान झालेल्या सर्वसमावेशक आप-आपसांतील व्यावसायिक आराखडा तयार करणेत यावा ही विनंती