शेतकरी कंपन्यांमार्फत ४००० कांदा उत्पादकांच्या माध्यमातून होणार एकाच वाणाचे उत्पादन
नाशिक, ता. ४ सप्टें : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी आणि त्याचबरोबर बाजारामध्ये एकाच पद्धतीचा कांद्याचा ब्रँड करण्यासाठी महाएफपीसी द्वारे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत असून सात जिल्ह्यांमधील ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सुमारे ४००० सभासद शेतकऱ्यांना एकाच वाणाचे उच्च गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यात येणार आहे. एनएचआरडीएफ ‘सिलेक्शन’ पद्धतीने संशोधित रेड-३ ( L - ६५२) या कांदा बियाणांचे २०० कांदा उत्पादक गावांमधील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
सदर जातीमध्ये पायरुव्हिक ऍसिड व टीएसएस यांचे प्रमाण अधिक असल्याने साठवणूक क्षमता चांगली असून हेक्टरी उत्पादकता ३५-४० टन इतकी आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना खत व औषधे यांचे देखील नियोजन देण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment