शेतकरी कंपन्यांची मुल्यवर्धन साखळीत एप्रिल मध्ये ११९०० मनुष्य दिवस रोजगार निर्मिती
पुणे, ५ मे : राज्यात दुष्काळाचे मोठे सावट असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ग्रामीण भागातील शेतमजुरांना रोजगारउपलब्ध करून देऊन मोठा दिलासा दिला आहे. साधारणपणे दररोज ७०० लोकांना कांदा प्रतवारी, हाताळणी,, साठवणूक हमाली आदी मुल्यवर्धन कामांमध्ये रोजगार निर्मिती करून दिली जात आहे.
महा ओनीयन या नाफेड - महा एफ पीसी यांच्या संयुक्त भागीदारी प्रकल्पा मार्फत राज्यात किंमत स्थिरीकरण योजने अंतर्गत २७ शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत गेल्या महिनभरापासून कांदा खरेदी सुरू आहे. कांदा खरेदी करताना प्रतवारी महत्त्वाची असून या कामासाठी कौशल्य असणाऱ्या मजुरांना प्राधान्य मिळते. यासाठी शेतकरी कंपन्यांनी प्रतवारी करण्यासाठी मजुरांना प्रशिक्षित केले असून तेच मजूर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याची हाताळणी करत आहेत. यामुळे शेतकरी देखील याबाबत जागरूक होत असून त्यांची मुल्यवर्धनात क्षमता बांधणी होत आहे.
आदर्श ग्रामीण अँग्रो प्रो.कं.लि.पिंप्री लौकी.ता.संगमनेर संपुर्ण कंपनी मार्फत गत महिन्यात ५००० क्विंटल कांदा खरेदी केली आहे. कंपनीचे संचालक दिलीप लावरे यांनी महाएफपीसी शी बोलताना सांगितले की कांदा खरेदी एेन दुष्काळी परिस्थितीमध्ये असल्याने ६१ शेतमजुराना १ महिन्यापासुन काम मिळाले आहे त्याचबरोबर वाहतूक करताना ७ पिकअप गाडी व प्रशासकीय कामासाठी ५ सुपरवायझर अशा पद्धतीने ८० लोकांना कंपनीने 1महिन्या पासुन काम दिल्याचे समाधान आहे.तसेच १५६ शेतकर्यांनी कांदा कंपनीकडे विक्री केला मार्केट रेट पेक्षा २००/- रू किंटलला जास्त भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. साधारणपणे आणखी एक महिना सदर काम चालणार आहे.
प्रामुख्याने या कामात महिला शेत मजुरांचा समावेश असून भविष्यात मुल्यवर्धन साखळीत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती साठी महा एफ पीसी मार्फत प्रयत्न केले जाणार आहेत.
Comments
Post a Comment