शेतकरी कंपन्यांमार्फत मूग, उडीद, सोयाबीन हमीभाब खरेदी केंद्रे सुरु होणार : महाएफपीसी


मुंबई : २१ ऑगस्ट हमीभाव खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत खरेदी केंद्रे सुरु होणार आहेत.   राज्य शासनाने महा एफपीसी ला अभिकर्ता    संस्थेचा दर्जा दिल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांचा हमीभाब खरेदीचा मार्ग खुला झाला आहे. मंत्रालयात पणन सचिवांच्या दालनात नियोजनाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक  पार पडली. यावेळी महाएफपीसी, महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ फेडरेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

महाएफपीसी  मार्फत यासाठी नियोजन सुरु झाले असून जिल्हानिहाय पूर्वतयारी बैठका सुरु झाल्या आहेत. लातूर येथे पहिली बैठक संपन्न  झाली असून सुमारे ७० ‘कंपन्यांनी खरेदीसाठी तयारी दर्शविली आहे. इच्छुक संस्थांनी महाएफपीसी कार्यालयात ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा

Comments

Popular posts from this blog

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री