महाएफपीसीची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ४५ दिवसांची मुदतवाढ
पुणे, ता. २९ राज्य शासनाची अभिकर्ता संस्था म्हणून राज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होऊ नये यासाठी महाएफपीसीने कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील रजिस्ट्रार ऑफ कंपनी यांचेकडे सर्वसाधारण सभा राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर घेण्याची विनंती केली होती. यानुसार रजिस्ट्रार ऑफ कंपनी यांचेकडून ४५ दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
महाएफपीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची ३० सप्टेंबर हि अंतिम मुदत होती. परंतु महाएफपीसीची शासनाची हमीभाव योजनेअंतर्गत कडधान्ये व तेलबिया खरेदीसाठी राज्य स्तरीय अभिकर्ता संस्था असल्याने आचारसंहितेचा भंग तसेच मूग, उडीद व सोयाबीन खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये या कारणास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपनी कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ६ महिन्यांच्या आत कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. जास्तीतजास्त ३ महिन्याची मुदतवाढ मिळू शकते तसेच दोन सर्वसाधारण सभांमधील कालावधी १५ महिन्यांपेक्षा अधिक असू नये अशी तरतूद आहे.
सर्वसाधारण सभेबाबत पुढील माहिती सभासदांना लवकरच महाएफपीसी व्यवस्थापना मार्फत देण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment