महाएफपीसी मार्फत हमीभाव खरेदीचे चुकारे तीन दिवसांत शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात.
पुणे : १८ ऑक्टोबर, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर मुगाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यास सुरुवात केली आहे. साधारपणे खरेदी केलेला शेतमाल गोदामांमध्ये गेल्यापासून साधारणपणे ३ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे पेमेंट थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या बँक खात्याची बिनचूक माहिती खरेदी केंद्रांवर जमा करावी असे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात महाएफपीसी मार्फत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वेळेत पेमेंट करण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने या कामी सुसुत्रता आली आहे. हमीभाव खरेदीचे उशिरा चुकारे होण्याच्या कारणास्तव या योजनेस शेतकरी म्हणावा असा प्रतिसाद देत नाहीत. असा शेतकऱ्यांचा समज होता परंतु यंदा मात्र अशी वस्तुस्तिथी नाही हे सिद्ध झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करून बाजारभावापेक्षा शेतमालाचे दर कमी असल्यास हमीभाव खरेदी केंद्रांवर विक्री करावी. तसेच त्यांचे वेळेत पेमेंट होतील. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
“जिवाजी महाराज शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे अवघ्या दोन दिवसांत मिळाल्याने शेतकरी हमीभाव खरेदी नोंदणी प्रक्रियेकडे आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे.”
- श्री. अशोक जाधव
Comments
Post a Comment