बीड मधील शेतकरी कंपन्यांचा आदर्शवत हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याचा संकल्प
बोरखेड ( पाटोदा, बीड ) ता. २४ ऑगस्ट : हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड मधील शेतकरी उत्पादक कंपन्या सज्ज झाल्या असून त्यांनी राज्यात पारदर्शक व शेतकरी केंद्रित हमीभाव खरेदी चा राज्यात आदर्शवत असा ‘बीड पॅटर्न’ निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. येत्या खरीप हंगामामधील हमीभाव खरेदी सुरु होत असल्याने महाएफपीसी मार्फत राज्यभर जिल्हानिहाय नियोजन बैठका सुरु आहेत. बीड जिल्यातील कंपन्यांची बैठक बोरखेड ( ता. पाटोदा ) येथे नुकतीच पार पडली. यावेळी ७ तालुकयांमधील १७ शेतकरी उत्पादक कंपन्या उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment