पीपीपी- आयएडी कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निविदा सूचना जाहीर


पुणे, २० कांदा साठवणूक ( १००० मे. टन ) व पणन सुविधा ( ग्रेडिंग शेड व ५० टन वजनकाटा ) उभारणीसाठी महा ओनियन ( नाफेड- महाएफपीसी संयुक्त भागीदारी प्रकल्प )  मार्फत निविदा मागविल्या असून कागदपत्रे निविदा कागदपत्रे  http://www.mahafpc.org/Tender_Document.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. सामायिक सुविधा शेड,  कांदा साठवणूक चाळ बॉक्स व वजनकाटा या तिन्ही घटकांसाठी एकत्रिपणे किंवा स्वतंत्रपणे निविदा भरू शकतात. तसेच अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील १६ शेतकरी कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर प्रकल्प उभारणीसाठी तीन क्लस्टर करण्यात आले असून कंत्राटदार किमान एक किंवा अधिक क्लस्टर साठी निविदा भरू शकतो. इच्छुक पात्र संस्थांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २७.१२. २०१९ पर्यंत  महाएफपीसी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून निविदा सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

MAHAFPC successfully bids for country’s first Reverse e-auction of Onion through MSTC

महा ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची पुणे शहरात रिटेल कांदा विक्री