पीएम- आशा अंतर्गत सोयाबीन हमीभाव पथदर्शी प्रकल्पासाठी शेतकरी कंपन्यांची तयारी सुरु
लातूर, ता. २१ केंद्र शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न अभियान ( पी एम -आशा ) अंतर्गत हमीभाव योजनांची पुर्नरचना केली असून तेलबियांसाठी खाजगी खरेदी व साठवणूक योजनेअंतर्गत (पीपीएसएस) देशात ८ पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून महाएफपीसी मार्फत लातूर जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांनी देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. या योजनेची शेतकरी कंपन्यांना माहिती देण्यासाठी लातूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
Comments
Post a Comment