मार्च २०२० अखेरीस शेतकरी कंपन्यांद्वारे २५ हजार टनाचे कांदा स्टोअरेज ग्रीड उभारणार : संजीवकुमार चड्ढा
पुणे : १९ ऑक्टोबर, राज्य सरकारने नाफेड -महाएफपीसी व शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा संयुक्त भागीदारी असणारा २४ कोटी रुपयांच्या कांदा साठवणूक व पणन प्रकल्पास मंजुरी दिली आहे. यामध्ये राज्य शासन ५० टक्के गुंतवणूक करत असून शेतकरी कंपन्या व नाफेड उर्वरित गुंतवणूक करत आहेत. सदर प्रकल्पाच्या द्वारे देशात कांद्याची बफर साठा साठवणूक करण्यासाठी पायाभूत सुविधा उभी राहणार आहे. तसेच शेतकरी कंपन्यांना व्यावसायिक संधी मिळणार आहे.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान पुणे येथे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चड्ढा यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत झालेल्या कांदा खरेदीचा आढावा घेण्यात आला. कांदा साठवणुकीमधील नुकसान टाळण्यासाठी या स्टोअरेज ग्रीडचा मोठा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सदर प्रकल्पात पहिल्या टप्यात ७ कंपन्यांचे करार झाले असून उर्वरित कंपन्यांची निवडप्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्यात येणार आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने या प्रकल्पात तांत्रिक सल्लगार म्हणून काम करण्यास तत्वतः मंजुरी दिल्याने राष्ट्रीय कांदा, लसूण संशोधन केंद्र ,राजगुरूनगर यांची मदत घेतली जाणार
Comments
Post a Comment