शेतकरी कंपन्यांच्या १०,००० सभासदांची मूग, उडीद, सोयाबीन हमीभाव खरेदी साठी नोंदणी
पुणे ता. १३, राज्यात उत्पादक कंपन्यांमार्फत १७ जिल्ह्यांमधील १०५ शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केली असून पहिल्या टप्यात मूग,उडीद व सोयाबीन या पिकांच्या हमीभावाने विक्रीसाठी १०,००० सभासद शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून प्रत्यक्ष खरेदीला देखील सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातील कंपन्यांनी नोंदणी प्रक्रियेत आघाडी घेतली असून २३१३ शेतकरी नोंदणीकृत झाले आहेत. त्यापाठोपाठ हिंगोली (१४००), बीड (११२४), परभणी ( १०५२) या जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची नियोजनबद्धरित्या प्रचार व प्रसिद्धी केली असून शेतकऱ्यांनी देखील नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यातुलनेत अमरावती, वाशीम व जळगाव जिल्ह्यात मात्र शेतकरी कंपन्यांकडून समाधानकारक कामगिरी होत नसल्याचे दिसून येत आहे.
तसेच बाजारात सोयाबीनचे दर घसरत चालल्याने आणि सोयाबीन नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याने पुढील आठवड्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करतील व वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात कंपन्यांशी संपर्क साधावा असे महाएफपीसी मार्फत आव्हान करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment