१५ सप्टेंबर पासून मूग , उडीद व १ ऑक्टोबर पासून सोयाबीन PSS खरेदी नोंदणी सुरु होणार
औरंगाबाद ता. २६ खरीप हंगामात यंदाच्या वर्षी पावसाची परिस्थिती राज्यात कमी अधिक प्रमाणात असल्याने पिकांचे उत्पादन व उत्पादकता यावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच बाजारामधील मंदीचे सावट लक्षात घेता उत्पादित झालेल्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्याची देखील फारशी शाश्वतता नसल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी हमीभाव योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची पर्यायी विक्री देखील उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यक्ता आहे. याच उद्देशाने महाएफपीसी माफ डाळी व तेलबिया खरेदीसाठी औरंगाबाद येथील शेतकरी कंपन्यांची कंपन्यांची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात बैठक संपन्न झाली.
Comments
Post a Comment