शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी आढावा बैठक संपन्न
औरंगाबाद : महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा बैठक कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे पार पडली. यावेळी अहमदनगर, पुणे, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत.
तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment