महा- ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची १ लाख क्विंटल कांदा खरेदी
पुणे, ता. १४: नाफेड व महा एफ पी सी यांचा संयुक्त भागीदारी प्रकल्प असणाऱ्या महा ओनियन मार्फत राज्यातील ३४ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण योजने अंतर्गत १ लाख क्विंटल कांदा खरेदी पूर्ण करून खरेदीचा उच्चांक केला आहे.
आणखी १ लाख क्विंटल कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सदर खरेदी मुळे बाजारभाव स्थिर राहिले आहेत.
Comments
Post a Comment