शेतकरी कंपन्यांना एमआयडीसी मध्ये प्राधान्यक्रमाने भूखंड उपलब्ध होणार
मुंबई, ता. ५ डिसें: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील कृषी औद्योगिकरणाला गती देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने एमआयडीसी मध्ये जागा उपलब्ध करून देत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली.
यावेळी बैठकीत बोलताना
उद्योगमंत्र्यांनी क्लस्टर स्तरावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध
करून देण्याबरोबरच उद्योग विभागाद्वारे सुरु असणाऱ्या विविध योजनांद्वारे कृषी
मूल्यवर्धन साखळीत आणण्यासाठी सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले.
बैठकीसाठी सह्याद्री फार्म्स चे
विलास शिंदे, महाएफपीसीचे योगेश थोरात, विठ्ठल पिसाळ, गो-फॉर-फ्रेश चे मारुती चापके, लातूर शेतकरी
कंपनीचे श्री. भिसे , लालासाहेब देशमुख, विलास उफाडे, दिपक पाटील आदी उपस्थित होते.
***
Good धन्यवाद
ReplyDelete