केरळ सरकार शेतकरी कंपन्यांकडून करणार कांद्याची खरेदी
थ्रिसुर, दि. २७ डिसें. केरळ राज्यात कांद्याचे उत्पादन होत
नसल्याने ग्राहकांना महागाईला तोंड द्यावे लागत असल्याने मध्यस्थांची साखळी कमी
करून थेट शतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आता सरकारच्या वतीने खरेदी होणार
आहे. याबाबत महाएफपीसीचा व केरळ स्टेट फलोत्पादन विकास कार्पोरेशन या सरकारी
मालकीच्या कंपनीशी करार झाला आहे.
यावेळी केरळचे कृषी मंत्री व्ही. सुनीलकुमार, प्रधान कृषी
सचिव डी. के. सिंग, महाएएफपीसी चे योगेश थोरात, हॉर्टीकॉर्प चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बाबू थॉमस
व सरव्यवस्थापक श्रीमती व्ही. रजेथा, केरळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.
चंद्राबाबू उपस्थित होते.

Comments
Post a Comment