कांदा प्रश्नावर तोडग्यासाठी शेतकरी कंपन्यांची सोमवारी महत्वपूर्ण बैठक : महाएफपीसी
पुणे, ता. ८ डिसें. : कांद्याचे कमी होणारे दर यामुळे
राज्यामधील शेतकरी हवालदिल झाला आहे. महाएफपीसी च्या माध्यमातून शेतकरी कंपन्यांनी
कांदा पिकामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण
योजनेच्या माध्यमातून बाजारभाव स्थिर ठेवण्यास मदत केली होती.
सद्य स्थितीला शेतकरी कंपन्यांकडून सुरु असलेल्या आंतरराज्य कांदा व्यापाराचा आढावा घेऊन राज्य शासनाकडून वाहतूक अनुदान सुलभता तसेच केंद्र शासनाकडून ‘ऑपरेशन ग्रीन’ च्या
माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत रणनीती ठरविण्यासाठी सोमवार (दि. १० )
रोजी महाएफपीसी ने पुणे येथे बैठक आयोजित केली आहे.
Comments
Post a Comment