सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे ‘TOP’पिकांसाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात : योगेश थोरात

 नवी दिल्ली, ता. २९ :  नाफेड मुख्यालयात ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चढ्ढा, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस.के. सिंग व अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत भागधारकांची विशेष बैठक पार पडली.  यावेळी महाराष्ट्रात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘कांदा स्टोरेज’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. 


यावेळी बोलताना श्री. थोरात यांनी कांदा, टोमॅटो व बटाटा पिकांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे पायाभूत सुविधा उभ्या करण्याचे इतर राज्यांच्या प्रतिनिधींना आवाहन केले. यावेळी आसाम, आंध्र  प्रदेश, राजस्थान, केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड, हरियाना आदी राज्यांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.

Comments