कृषी पणन अध्यादेशाच्या सहमतीबाबत शरद पवार पुढाकार घेणार : महाएफपीसी
पुणे, ता. ९ डिसें. राज्य शासनाचा कृषी पणन (विकास व नियमन ) अध्यादेश विधानसभेत
पारित झाला होता परंतु व्यापारी वर्गाच्या विरोधामुळे सरकारने विधानपरिषदेत
अध्यादेश मागे घेतला. राज्यातील कृषी पणन सुधारणांना गती देण्यासाठी सदर अध्यादेश
विधिमंडळात पारित होऊन त्याचे कायद्यात रुपांतर होणे गरजेचे आहे. याबाबत महाएफपीसी
च्या वतीने योगेश थोरात यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची पुणे येथील त्यांच्या
निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की, ‘ अध्यादेशाचा आपण
सविस्तर अभ्यास आपण केला आहे. कृषी पणन अध्यादेशाबाबत विरोध करणाऱ्या लोकांचे काही
मुद्यांबाबत मतभेद आहेत. परंतु याबाबत तोडगा काढण्यासाठी आपण संयुक्त बैठक घेणार आहोत.’
यापूर्वीच महाएफपीसी च्या वतीने अध्यादेशाचे महत्व व गरज याबाबत सविस्तर निवेदन श्री. पवार यांना दिले होते.
राज्य शासनाने अध्यादेशाचा पुनर्विचार करण्यासाठी समिती गठीत
केली आहे. त्यामुळे आगामी विधीमंडळांच्या अधिवेशनात
कृषी पणन अध्यादेश पारित होण्याची चिन्हे
आहेत.
Comments
Post a Comment