Posts
MAHAONION- Onion Storage and Marketing Infrastructure - Nathaji FPC, Aur...
- Get link
- X
- Other Apps
कृषी विधेयके मूल्य साखळी केंद्रित असल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा : योगेश थोरात
- Get link
- X
- Other Apps
पुणे , १९ सप्टेंबर २०२० : लोकसभेत पारित झालेल्या कृषी पणन विधेयकाच्या संदर्भात योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महाएफपीसी पुणे यांनी न्यूज १८ नेटवर्क लोकमत च्या चर्चेत भाग घेतला यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी मूल्य आयोगांचे माजी अध्यक्ष पाशा पटेल आणि शेती अभ्यासक विजय जावंधिया आदी उपस्थित होते.
वखार महामंडळातील माथाडी कामगारांना PSS हाताळणीसाठी शासन दर बंधनकारक
- Get link
- X
- Other Apps
पुणे, ८ सप्टें : हंगाम २०२०-२१ च्या हमीभाव खरेदी साठीच्या खर्चाचे दर राज्य शासनाने निर्धारित केले असून वखार महामंडळात काम करणाऱ्या माथाडी कामगारांसाठी तेच दर लागू राहतील व याबाबत कामगार आयुक्तांमार्फत कार्यवाही केली जाणार असून महामंडळाने देखील loading व unloading दर आपल्या स्तरावरून कळविण्याबाबत पणन विभागाने सूचना केल्या आहेत. माथाडी कामगार PSS खरेदीचा हमाली करताना वेगवेगळ्या पद्धतीने अवाजवी दर आकारत असल्याची बाब अनेक शेतकरी कंपन्यांनी निदर्शनास आणून दिली होती. या निर्णयामुळे शेतमाल हाताळणी निर्धारित खर्चात करणे शक्य होणार आहे.
शेतकरी कंपन्यांमार्फत मुग हमीभाव खरेदी नोंदणी १५ सप्टेंबर पासून सुरु होणार
- Get link
- X
- Other Apps
पुणे, ८ सप्टें : हंगाम २०२०-२१ मधील हमीभाव खरेदीचे नियोजन साठी व नाफेड, नवी दिल्ली आणि राज्य शासन स्तरावर पूर्ण झाल्याने खरीप हंगामातील डाळींची खरेदी प्रक्रिया सुरु होणार आहे. सध्या बाजारात मुगाची आवक सुरु झाली असली तरी आद्रतेचे प्रमाण अधिक असल्याने १५ सप्टेंबर पासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून तसेच केंद्र शासनाकडून हमीभाव खरेदीला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने एफएक्यू दर्जाचा मूग खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात महाएफपीसीमार्फत मराठवाडा व विदर्भातील १६ जिल्ह्यांमध्ये ११९ खरेदी केंद्रे सुरु करण्याचे नियोजन असून मूग व उडीदाची अनुक्रमे ४७२०० क्विंटल आणि ६८२०० क्विंटल खरेदीचा अंदाज आहे. खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा ( क्लिनींग, ग्रेडींग, गोदामे ) आणि क्रियाशील भागधारक सभासद तसेच उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या संस्थांचा प्राथमिकतेने विचार केला जाणार आहे.
एमआयडीसी च्या पुढाकारातून कृषी औद्योगिकरणाला गती देण्याची गरज : महाएफपीसी
- Get link
- X
- Other Apps
मुंबई, २८ जुलै : कोरोना संकटानंतर कृषी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र शासनाने वटहुकुमांद्वारे कृषी पणन सुधारणांची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कृषी पायाभूत सुविधा निर्माण करून कृषी औद्योगिकरणाला बळकटी देण्याची गरज आहे. राज्याच्या विकासात उद्योग विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या एमआयडीसी मार्फत औद्योगिकरणाला मोठी गती आली. त्याच धर्तीवर राज्यातील औद्योगिकरणाचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी शेतीशी निगडित असणाऱ्या उद्योगधंद्यांना पायाभूत सुविधा विकसित करून देऊन कालबद्ध शेती विकासाचे उद्दिष्टय ठेवण्याची गरज असल्याचे मत महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याशी व्यक्त केले. याबाबत उद्योगमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असून शासन शेती व शेतकऱ्यांच्या विकासाबाबत कटिबद्ध असल्याचे सांगितले.
अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीची १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास योजनेला मंजुरी
- Get link
- X
- Other Apps
नवी दिल्ली, ता. १९ फेब्रुवारी : केंद्र शासनाच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास करणे या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. या योज़नेअंतर्गत २०१९- २४ या कालावधीसाठी ४४९६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी २३६९ कोटी रुपयांची तरतुदीची हमी दिली आहे. या कार्यक्रमासाठी लघु कृषक व्यापार संघ, एनसीडीसी व नाबार्ड या नोडल संस्था कार्यरत असणार आहे. तसेच १००० कोटी रुपयांचा क्रेडिट ग्यारंटी निधी निंर्माण करणार आहे. ****
UP Ahead in Reforms, FPOs may hike Agri-GDP by 10%
- Get link
- X
- Other Apps
Gorakhpur, 29 Dec : Yogesh Thorat on Sunday said that Uttar Pradesh is taking lead for adopting Agriculture Marketing Reforms and organised small & marginal farmer through FPOs and their engagement in value chains can contribute additional 10 % in Agri-GDP of the state which is presently 26%. Addressing, NABARD Kisan Samaroh in presence of Chief Minister Yogi Adityanath at Deen Dayal Upadhyay, University Thorat said, “Maharashtra FPCs success has four dimensions i.e. organised small & marginal farmers ; business models of value addition at village level; Employment generation in value chain and Bringing Investment in the sector. As a result FPCs in the state are showing good performance in the country.” He congratulated the CM Yogi Adityanath for keeping FPOs at the Center stage in agriculture marketing reforms and further requested him to delink Market Cess from the APMC for promoting investment in Agriculture Marketing. He further said, “F...
पीपीपी- आयएडी कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निविदा सूचना जाहीर
- Get link
- X
- Other Apps
पुणे, २० कांदा साठवणूक ( १००० मे. टन ) व पणन सुविधा ( ग्रेडिंग शेड व ५० टन वजनकाटा ) उभारणीसाठी महा ओनियन ( नाफेड- महाएफपीसी संयुक्त भागीदारी प्रकल्प ) मार्फत निविदा मागविल्या असून कागदपत्रे निविदा कागदपत्रे http://www.mahafpc.org/Tender_Document.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. सामायिक सुविधा शेड, कांदा साठवणूक चाळ बॉक्स व वजनकाटा या तिन्ही घटकांसाठी एकत्रिपणे किंवा स्वतंत्रपणे निविदा भरू शकतात. तसेच अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील १६ शेतकरी कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर प्रकल्प उभारणीसाठी तीन क्लस्टर करण्यात आले असून कंत्राटदार किमान एक किंवा अधिक क्लस्टर साठी निविदा भरू शकतो. इच्छुक पात्र संस्थांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २७.१२. २०१९ पर्यंत महाएफपीसी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून निविदा सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
संस्थांच्या बळकटीकरणासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्ये आवश्यक : महाएफपीसी
- Get link
- X
- Other Apps
लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.
- Get link
- X
- Other Apps
लातूर, १२ डिसें. लातूर मधील हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केलेल्या १४ शेतकरी कंपन्यांची लातूर येथे बैठक पार पडली असून सध्या सोयाबीनचे बाजारभाव हमीभापेक्षा अधिक असल्याने कंपन्यांनी बाजारभावाने सोयाबीन खरेदी करून प्रक्रियादारांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.
शेतकरी कंपन्यांमार्फत १०,००० क्विंटल सोयाबीनचा थेट प्रक्रियादारांना पुरवठा
- Get link
- X
- Other Apps
पुणे, ता. ११ डिसें. : महाएफपीसीच्या पुढाकारातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांमार्फत आजपर्यंत १०,००० क्विंटल सोयाबीनची खरेदी करून सोयाबीन प्रक्रिया करणाऱ्या कार्पोरेट प्रक्रियादारांना पुरवठा करण्यात आला आहे. कंपन्यांनी हमीभाव खरेदी केंद्रे देखील सुरु केली होती परंतु बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असल्याने तसेच एफएक्यू दर्जा नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून प्रक्रियादारांशी खरेदी सुरु केल्याने शेतकऱ्यांना कंपनी स्तरावरच बाजारसुविधा उपलब्ध झाली आहे.
इस्लामपूरला शेतकरी कंपन्यांची शनिवारी पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक
- Get link
- X
- Other Apps
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बैठकीचे आयोजन दि. ७/१२/२०१९ रोजी हॉटेल भैरवनाथ (खानावळ), डांगे पेट्रोल पंपा शेजारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती जवळ, इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली येथे दुपारी १२ वाजता मिटिंग चे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी महाएफपीसी चे अध्यक्ष योगेश थोरात व इतर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फ़त हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे, खत व चहा विक्रीसाठी डिलरशिप देणे,सोयाबीन व डाळींचा खासगी व्यापार, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अडचणी, नवीन व्यावसायिक संधी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन रामराव पाटील ( 7768065707 ) सुभाष पाटील ( 9403780147 )यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाएफपीसी कार्यालयाशी संपर्क साधावा (प्लॉट नं. ६२४, नाफेड बिल्डींग, मार्केट यार्ड, पुणे – ३७ संपर्क क्र – 020 24272827 , वैभव- 8600908809 )
विदर्भातील शेतकरी कंपन्या करणार धान खरेदी
- Get link
- X
- Other Apps
अमरावती, २३ नोव्हे. महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा अमरावती येथे पार पडली. यावेळी अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा जिल्ह्यातील खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा,चंद्रपूर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे. यावेळी महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, सुधीर इंगळे, अक्षय जायले, डॉ. गणेश खारकर मनोहर सुने, स्वनिल ढोले, तुषार खारकर, नाफेड चे अधिकरी नितिन सुक्रे आणि विदर्भातील ८१ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकरी कंपन्यांनी शेतमालाच्या विक्रीसाठी संघटित व्हावे : महाएफपीसी
- Get link
- X
- Other Apps
नाशिक, २२ नोव्हे. : कृषीथॉन या शेतीविषयक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित महा-खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ सानप यांनी राज्यातील शेतकरी कंपन्यांनी महाएफपीसीच्या माध्यमातून संघटित होऊन आपली बाजारात ताकद दाखविणे आवश्यक आहे व यासाठी एकत्रितपणे मूल्यवर्धन करून शेतमालाची विक्री करावी असे आवाहन केले
शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी आढावा बैठक संपन्न
- Get link
- X
- Other Apps
औरंगाबाद : महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा बैठक कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे पार पडली. यावेळी अहमदनगर, पुणे, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे.
महाएफपीसी ची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (१४ नोव्हेंबर )
- Get link
- X
- Other Apps
पुणे, १२ सप्टें: महा एफपीसी ची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ रोजी पुणे मर्चंट चेंबर, गुलटेकडी,मार्केट यार्ड, पुणे येथे सकाळी ११:०० वाजता होणार आहे. आचारसंहितेच्या कारणास्तव महा एफपीसी ला रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली होती.