शेतकरी कंपन्यांमार्फत मुग हमीभाव खरेदी नोंदणी १५ सप्टेंबर पासून सुरु होणार
पुणे, ८ सप्टें : हंगाम २०२०-२१ मधील हमीभाव खरेदीचे नियोजन साठी व नाफेड, नवी दिल्ली आणि राज्य शासन स्तरावर पूर्ण झाल्याने खरीप हंगामातील डाळींची खरेदी प्रक्रिया सुरु होणार आहे. सध्या बाजारात मुगाची आवक सुरु झाली असली तरी आद्रतेचे प्रमाण अधिक असल्याने १५ सप्टेंबर पासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले असून तसेच केंद्र शासनाकडून हमीभाव खरेदीला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने एफएक्यू दर्जाचा मूग खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यात महाएफपीसीमार्फत मराठवाडा व विदर्भातील १६ जिल्ह्यांमध्ये ११९ खरेदी केंद्रे सुरु करण्याचे नियोजन असून मूग व उडीदाची अनुक्रमे ४७२०० क्विंटल आणि ६८२०० क्विंटल खरेदीचा अंदाज आहे. खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा ( क्लिनींग, ग्रेडींग, गोदामे ) आणि क्रियाशील भागधारक सभासद तसेच उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या संस्थांचा प्राथमिकतेने विचार केला जाणार आहे.
Comments
Post a Comment