वखार महामंडळातील माथाडी कामगारांना PSS हाताळणीसाठी शासन दर बंधनकारक
पुणे, ८ सप्टें : हंगाम २०२०-२१ च्या हमीभाव खरेदी साठीच्या खर्चाचे दर राज्य शासनाने निर्धारित केले असून वखार महामंडळात काम करणाऱ्या माथाडी कामगारांसाठी तेच दर लागू राहतील व याबाबत कामगार आयुक्तांमार्फत कार्यवाही केली जाणार असून महामंडळाने देखील loading व unloading दर आपल्या स्तरावरून कळविण्याबाबत पणन विभागाने सूचना केल्या आहेत.
माथाडी कामगार PSS खरेदीचा हमाली करताना वेगवेगळ्या पद्धतीने अवाजवी दर आकारत असल्याची बाब अनेक शेतकरी कंपन्यांनी निदर्शनास आणून दिली होती. या निर्णयामुळे शेतमाल हाताळणी निर्धारित खर्चात करणे शक्य होणार आहे.
Comments
Post a Comment