बोरी, ता. २५ ऑगस्ट, परभणी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची पीएसएस खरेदी केंद्रे सुरु करण्यासाठी वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, वर्ण ( ता. जिंतूर) येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील १३ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेलू, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, मानवत, पालम या मूग व उडीद उत्पादक तालुक्यांमध्ये पीक परिस्थिती विचारात घेऊन खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. साधारपणे सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ७५०० क्विंटल खरेदीची शक्यता आहे. बिगर सभासद शेतकरी उत्पादकांना खरेदी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी उत्पादक कंपन्यांचे सभासद करून घेण्यासाठी जिल्हास्तरीय अभियान घेण्यात येणार आहे.