राज्यात १० लाख टन सोयाबीन हमीभाव खरेदीचा लक्ष्यांक

पुणे : केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १० लाख टन सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक मंजूर केला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठीं जोरदार तयारी केली आहे. राज्यात पावसामुळे सोयाबीन पिकाचे २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. कमी उत्पादनामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे. मात्र बाजारात बाजारभाव वाढीचा फारसा कल दिसून येत नाही. तरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व बाजारभावामधील चढ उताराचा धोका धोका कमी करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी असे आवाहन महाएफपीसी मार्फत करण्यात येत आहे.