धुळे,नंदुरबार, नाशिक औरंगाबाद जिल्ह्यांमधील कंपन्यासाठी मका खरेदीचे होणार करार
मुंबई, ता. २५ : शेतकरी उत्पादक कंपन्याकडून थेट
शेतमाल खरेदी करण्याची तयारी स्टार्च प्रक्रिया उद्योजकांनी दर्शवली आहे. अतिरिक्त
मुख्य सचिव (पणन ) श्री. अनुपकुमार यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झाली
यावेळी युनिव्हर्सल स्टार्च चे अध्यक्ष सरकार (जे.जे. ) रावल, श्री. ददिना व योगेश
थोरात उपस्थितीत होते.
महाएफपीसी ने प्रामुख्याने मका या पिकासाठी विशेषतः धुळे,नंदुरबार
जिल्ह्यांमध्ये काम करण्याची श्री. अनुपकुमार यांनी सूचना केली. सरकार रावल यांनी अशा भागीदारीमुळे
प्रक्रिया उद्योगांना मदत होईल. तसेच त्यांनी शेतकरी कंपन्यांना शेतमाल खरेदीसाठी
अर्थसहाय्य देखील उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment