लातूर मध्ये शेतकरी कंपन्यांमार्फत सोयाबीन विक्रीसाठी विशेष प्रयत्न होणार : महाएफपीसी
लातूर, ता. १८ आत्मा कार्यालय लातूर यांनी महाराष्ट्र
स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पाअंतर्गत आयोजित केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी
आयोजित केलेल्या खरेदीदार -विक्रेता कार्यशाळेमध्ये मागदर्शन करताना महाएफपीसी चे
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पवार यांनी कंपन्यांद्वारे सोयाबीन विक्रीसाठी
कार्पोरेट लिंकेजच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली. कंपन्यांच्या
द्वारे सोयाबीन ची थेट खरेदीदार प्रामुख्याने प्रक्रियादार यांना विक्री
करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षा
कमी असल्यास खाजगी खरेदीदार/ साठवणूकदार यांच्या मदतीने नवीन हमीभाव खरेदी
धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर खरेदी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करणार
असल्याची माहिती दिली.
तसेच डाळवर्गीय पिकांची हमीभाव दराने खरेदी
करण्यासाठी महाएफपीसी मार्फत खरेदीसाठीच्या किमान पायाभूत सुविधा, उत्तम व्यवस्थापन
असणाऱ्या कंपन्यांची त्यांच्या केवळ भागधारक शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव
खरेदीसाठी खरेदी केंद्र मंजूर करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. डी.एल. जाधव , एमसीडीसी
च्या रेश्मा साबळे, नाबार्ड चे श्री. रायवाड, एडीएम च्या श्रीमती शर्मा, कृषी पणन
तज्ञ श्री. वर्पे व जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित
होते.
Comments
Post a Comment