महाएफपीसी द्वारे शेतकरी कंपन्यांसाठी रचनात्मक काम : डॉ. हर्ष भानवाला, अध्यक्ष, नाबार्ड
मुंबई, ता. १८ : महाएफपीसीच्या माध्यमातून शेतकरी कंपन्यांसाठी देशभरात इतर राज्यांच्या तुलनेत प्रभावी व
रचनात्मक काम होत आहे व यामुळे महाराष्ट्रात या चळवळीला बळ मिळत आहे, असे गौरवोद्गार नाबार्ड चे
अध्यक्ष डॉ. हर्ष भानवाला यांनी महाएफपीसी च्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत
व्यक्त केले.
श्री. योगेश थोरात यांनी नाबार्ड च्या मुख्य
कार्यालयात डॉ. भानवाला यांची भेट घेतली. व
महाएफपीसी च्या वतीने प्रामुख्याने मार्केट लिंकेज साठी सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी डॉ. भानवाला यांनी कृषी
यांत्रिकीकरणामध्ये कंपन्यांमार्फत ‘कस्टम हायरिंग’ केंद्रांविषयी जाणून घेतले. यावेळी थोरात यांनी
नाबार्डने शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यापलीकडे
जाऊन कंपन्यांसाठी प्रामुख्याने सहज व सुलभतेने कर्जपुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण कर्ज उत्पादने विशेषतः काढणीपश्चात व मूल्यवर्धन
पुरवठा साखळी या क्षेत्रात नाबार्डने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Comments
Post a Comment