शेतकरी कंपन्यांचा ‘एमएसपी’ खरेदीत सहभाग निश्चित
नवी दिल्ली ता. १७ : महाराष्ट्रामधील शेतकरी उत्पादक कंपन्यांना एमएसपी खरेदीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने नवी दिल्ली येथे नाफेड मुख्यालयात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यामुळे यंदाच्या वर्षी कंपन्यांच्या सभासद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ या एमएसपी खरेदीच्या च्या नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे. पीएसएस खरेदी बरोबरच प्रामुख्याने तेलबियांसाठी भावांतर योजना (पीडीपीएस) व प्रायोगिक तत्वावर खाजगी खरेदी/ साठवणूकदार योजना (पीपीपीएस ) घोषित केल्याने महाएफपीसी च्या वतीने शेतकरी कंपन्यांना या नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
केंद्रीय नोडल संस्थांच्या वतीने पीएसएस अंतर्गत कडधान्ये व डाळींची खरेदी होणार असल्याने नाफेड ची भूमिका महत्वपूर्ण आहे. याशिवाय पीडीपीएस व पीपीपीएस द्वारे राज्य सरकारने खरेदी न केल्यास तेलबिया देखील पीएसएस मार्फत खरेदी केल्या जाणार आहेत. यामुळे थेट शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करण्यासाठी शेतकरी कंपन्यांना खरेदीदार संस्थांचे प्रतिनिधी म्हणून तर कंपन्यांच्या खरेदी कामांत सुसूत्रता व समन्वयासाठी महाएफपीसी ला अभिकर्ता संस्था म्हणून घोषित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून राज्य सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे नाफेड चे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार चड्डा यांनी निर्देश दिले आहेत.
यावेळी नाफेड चे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्याचे सहकार व पणन खात्याचे अपर सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे व महाएफपीसी चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात उपस्थित होते.
***

Comments
Post a Comment