महाएफपीसी च्या सर्वसाधारण सभेसाठी रतन टाटांचा शुभसंदेश तर सुरेश प्रभूंचा व्हिडीओ संवाद

पुणे, ता. २८ : महाएफपीसी ची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २८ रोजी पुणे येथे होत आहे. यंदाच्या वर्षी सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून भागधारकांना विशेष मार्गदर्शनासाठी टाटा उद्योगसमूहाचे मानद अध्यक्ष व टाटा ट्रस्ट चे अध्यक्ष रतन टाटा आणि भारत सरकारचे व्यापार व उद्योगमंत्री श्री. सुरेश प्रभू यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. रतन टाटांनी या काळात ते उपलब्ध नसल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसल्याबाबत तसेच आपण शक्यतो मोठ्या जमावापुढे कार्यक्रमासाठी उपस्थित राहत नसल्याचे सांगितले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपला हा संकल्प न सोडण्यासाठी माफी याचना पत्राद्वारे कळविला असून आपला मोठेपणा दाखवून दिला आहे आणि त्याचबरोबर संस्थेच्या सर्व कार्यात यशसिद्धी साठी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री श्री. सुरेश प्रभू हे परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांना या सभेसाठी उपस्थित राहता येत नसल्याने त्यांनी व्हिडीओ संदेश दिला आहे. तसेच संस्था करत असलेल्या कोणत्याही चांगल्या कामासाठी आपला पाठींब...