Posts

Showing posts from November, 2019

विदर्भातील शेतकरी कंपन्या करणार धान खरेदी

Image
अमरावती, २३ नोव्हे. महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा अमरावती येथे पार पडली. यावेळी अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा जिल्ह्यातील  खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा,चंद्रपूर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे. यावेळी महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात, सुधीर इंगळे, अक्षय जायले, डॉ. गणेश खारकर मनोहर सुने, स्वनिल ढोले, तुषार खारकर, नाफेड चे अधिकरी नितिन सुक्रे आणि विदर्भातील ८१ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

शेतकरी कंपन्यांनी शेतमालाच्या विक्रीसाठी संघटित व्हावे : महाएफपीसी

Image
नाशिक, २२ नोव्हे. : कृषीथॉन या शेतीविषयक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित महा-खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ  सानप यांनी राज्यातील शेतकरी कंपन्यांनी महाएफपीसीच्या माध्यमातून संघटित होऊन आपली बाजारात ताकद दाखविणे आवश्यक आहे व यासाठी एकत्रितपणे मूल्यवर्धन करून शेतमालाची विक्री करावी असे आवाहन केले

शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभाव खरेदी आढावा बैठक संपन्न

Image
औरंगाबाद : महाएफपीसी मार्फत सुरु असणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्र सुरु असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आढावा बैठक कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथे पार पडली. यावेळी अहमदनगर, पुणे, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील खरेदी केंद्रे संस्था उपस्थित होत्या. राज्यातील अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळल्याने हमीभाव खरेदीत अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या स्तरावर शेतमाल एफएक्यू करून खरेदी केंद्रावर आणण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तसेच आगामी काळातील तूर व हरभरा पिकांचे उत्पादन लक्षात घेता हमीभाव खरेदी नियोजन करण्यात येणार आहे. 

महाएफपीसी ची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (१४ नोव्हेंबर )

Image
पुणे, १२ सप्टें: महा एफपीसी ची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर  २०१९ रोजी पुणे मर्चंट चेंबर, गुलटेकडी,मार्केट यार्ड, पुणे येथे सकाळी ११:०० वाजता होणार आहे. आचारसंहितेच्या कारणास्तव महा एफपीसी ला रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली होती.

MAHAFPC - AHA workshop for Strengthening FPCs starts

Image
Pune, 6 Nov : Two days international workshop has been organised by Bonn ( Germany )  based German farmer Associations training institute  Andreas Hermes Akademie (AHA) and MAHAFPC at Pune. A selected group of 15 persons including Board members, Management Team of MAHAFPC & FPC leaders are part of this brainstorming session.  AHA trainers Poorvi Shah- Palouni and Norbert Grobbel will coordinate the session. This workshop will chalk out the further action for collaborative work for organisation development of MAHAFPC as well as farmer producer companies in the state of Maharashtra.