Posts

Showing posts from May, 2019

शेतकरी कंपन्यांचा लातूर येथे खरीप २०१९ मेळावा संपन्न

Image
लातूर , २२ मे : स्पर्धाक्षम   बाजार घटक म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्वतंत्र पणन व्यवस्था उभी करण्यासाठी महाएफपीसी व लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या पुढाकारातून लातूर येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर डाळी व सोयाबीन या पिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लातूर   जिल्ह्यातील ९१   शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरीप हंगाम २०१९ च्या नियोजनाची महत्वपूर्ण बैठक लातूर येथे पार पडली .  या बैठकीसाठी महाएफपीसी चे अध्यक्ष योगेश थोरात , लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे मोहन भिसे , बबन भोसले , लालासाहेब देशमुख , विलास उफाडे व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक उपस्थित होते . 

महा- ओनियन मार्फत शेतकरी कंपन्यांची १ लाख क्विंटल कांदा खरेदी

Image
पुणे, ता. १४: नाफेड व महा एफ पी सी यांचा संयुक्त भागीदारी प्रकल्प असणाऱ्या महा ओनियन मार्फत राज्यातील ३४ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण योजने अंतर्गत १ लाख क्विंटल कांदा खरेदी पूर्ण करून खरेदीचा उच्चांक केला आहे. आणखी १  लाख क्विंटल कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सदर खरेदी मुळे बाजारभाव स्थिर राहिले आहेत.

शेतकरी  कंपन्यांची मुल्यवर्धन साखळीत एप्रिल मध्ये ११९०० मनुष्य दिवस  रोजगार निर्मिती 

Image
पुणे, ५ मे : राज्यात दुष्काळाचे मोठे सावट असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ग्रामीण भागातील शेतमजुरांना रोजगारउपलब्ध करून देऊन मोठा दिलासा दिला आहे. साधारणपणे दररोज ७००  लोकांना कांदा प्रतवारी, हाताळणी,, साठवणूक हमाली  आदी मुल्यवर्धन कामांमध्ये रोजगार निर्मिती करून दिली जात आहे. महा ओनीयन या  नाफेड - महा एफ पीसी यांच्या संयुक्त भागीदारी प्रकल्पा मार्फत राज्यात किंमत स्थिरीकरण योजने अंतर्गत  २७ शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत गेल्या महिनभरापासून कांदा खरेदी सुरू आहे. कांदा खरेदी करताना प्रतवारी महत्त्वाची असून या कामासाठी कौशल्य असणाऱ्या मजुरांना प्राधान्य मिळते. यासाठी शेतकरी कंपन्यांनी प्रतवारी करण्यासाठी मजुरांना प्रशिक्षित केले असून तेच मजूर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याची हाताळणी करत आहेत. यामुळे   शेतकरी देखील याबाबत जागरूक होत असून त्यांची मुल्यवर्धनात क्षमता बांधणी होत आहे. आदर्श ग्रामीण अँग्रो प्रो.कं.लि.पिंप्री लौकी.ता.संगमनेर संपुर्ण  कंपनी मार्फत गत महिन्यात ५०००  क्विंटल कांदा खरेदी केली आहे. कंपनीचे संचालक दिलीप लावर...