Posts

Showing posts from December, 2019

UP Ahead in Reforms, FPOs may hike Agri-GDP by 10%

Image
Gorakhpur, 29 Dec : Yogesh Thorat on Sunday said that Uttar Pradesh is taking lead for adopting Agriculture Marketing Reforms and organised small & marginal farmer through  FPOs and their engagement in value chains can contribute additional 10 % in Agri-GDP of the state which is presently 26%.  Addressing, NABARD Kisan Samaroh in presence of Chief Minister Yogi Adityanath at Deen Dayal Upadhyay, University Thorat said, “Maharashtra FPCs success has four dimensions i.e. organised small & marginal farmers ;  business models of value addition at village level; Employment generation in value chain  and Bringing Investment in the sector. As a result FPCs in the state are showing good performance in the country.” He congratulated the CM Yogi Adityanath for keeping FPOs at the Center stage in agriculture marketing reforms and further requested him to delink Market Cess from the APMC for promoting investment in Agriculture Marketing. He further said, “F...

पीपीपी- आयएडी कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निविदा सूचना जाहीर

Image
पुणे, २० कांदा साठवणूक ( १००० मे. टन ) व पणन सुविधा ( ग्रेडिंग शेड व ५० टन वजनकाटा ) उभारणीसाठी महा ओनियन ( नाफेड- महाएफपीसी संयुक्त भागीदारी प्रकल्प )  मार्फत निविदा मागविल्या असून कागदपत्रे निविदा कागदपत्रे  http://www.mahafpc.org/Tender_Document.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. सामायिक सुविधा शेड,  कांदा साठवणूक चाळ बॉक्स व वजनकाटा या तिन्ही घटकांसाठी एकत्रिपणे किंवा स्वतंत्रपणे निविदा भरू शकतात. तसेच अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील १६ शेतकरी कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर प्रकल्प उभारणीसाठी तीन क्लस्टर करण्यात आले असून कंत्राटदार किमान एक किंवा अधिक क्लस्टर साठी निविदा भरू शकतो. इच्छुक पात्र संस्थांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २७.१२. २०१९ पर्यंत  महाएफपीसी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून निविदा सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. 

संस्थांच्या बळकटीकरणासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्ये आवश्यक : महाएफपीसी

Image
पुणे, १३ डिसें. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेमध्ये सुरु असणाऱ्या सहकार कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी कंपनी प्रशिक्षण दरम्यान महाएफपीसीच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि संस्थांच्या बळकटीकरणासाठी  व व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्ये आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. 

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

Image
लातूर, १२ डिसें. लातूर मधील हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केलेल्या १४ शेतकरी कंपन्यांची लातूर येथे बैठक पार पडली असून सध्या सोयाबीनचे बाजारभाव हमीभापेक्षा अधिक असल्याने कंपन्यांनी बाजारभावाने सोयाबीन खरेदी करून प्रक्रियादारांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. 

शेतकरी कंपन्यांमार्फत १०,००० क्विंटल सोयाबीनचा थेट प्रक्रियादारांना पुरवठा

Image
पुणे, ता. ११ डिसें. : महाएफपीसीच्या पुढाकारातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांमार्फत आजपर्यंत १०,००० क्विंटल सोयाबीनची खरेदी करून सोयाबीन प्रक्रिया करणाऱ्या कार्पोरेट प्रक्रियादारांना पुरवठा करण्यात आला आहे. कंपन्यांनी हमीभाव खरेदी केंद्रे देखील सुरु केली होती परंतु बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असल्याने तसेच एफएक्यू दर्जा नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून प्रक्रियादारांशी खरेदी सुरु केल्याने शेतकऱ्यांना कंपनी स्तरावरच बाजारसुविधा उपलब्ध झाली आहे. 

इस्लामपूरला शेतकरी कंपन्यांची शनिवारी पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक

Image
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बैठकीचे आयोजन दि.  ७/१२/२०१९  रोजी हॉटेल भैरवनाथ (खानावळ), डांगे पेट्रोल पंपा शेजारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती जवळ, इस्लामपूर ता. वाळवा जि.सांगली येथे दुपारी १२ वाजता मिटिंग चे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी महाएफपीसी चे अध्यक्ष योगेश थोरात व इतर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फ़त हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे, खत व चहा विक्रीसाठी डिलरशिप देणे,सोयाबीन व डाळींचा खासगी व्यापार,  शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अडचणी, नवीन व्यावसायिक संधी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन   रामराव पाटील (  7768065707  ) सुभाष पाटील ( 9403780147  )यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाएफपीसी कार्यालयाशी संपर्क साधावा  (प्लॉट नं. ६२४, नाफेड बिल्डींग, मार्केट यार्ड, पुणे – ३७ संपर्क क्र – 020 24272827 ,  वैभव-  8600908809 )