Posts

Image

MAHAONION - PPPIAD Tender

Image
Tender Documents are available at  http://rebrand.ly/Tender-Document-PPPIAD

अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीची १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास योजनेला मंजुरी

Image
नवी दिल्ली,  ता. १९ फेब्रुवारी  :  केंद्र शासनाच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास करणे या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. या योज़नेअंतर्गत २०१९- २४ या कालावधीसाठी  ४४९६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी २३६९ कोटी रुपयांची तरतुदीची हमी दिली आहे. या कार्यक्रमासाठी लघु कृषक व्यापार संघ, एनसीडीसी व नाबार्ड या नोडल संस्था कार्यरत असणार आहे. तसेच १००० कोटी रुपयांचा क्रेडिट ग्यारंटी निधी निंर्माण करणार आहे.           ****

UP Ahead in Reforms, FPOs may hike Agri-GDP by 10%

Image
Gorakhpur, 29 Dec : Yogesh Thorat on Sunday said that Uttar Pradesh is taking lead for adopting Agriculture Marketing Reforms and organised small & marginal farmer through  FPOs and their engagement in value chains can contribute additional 10 % in Agri-GDP of the state which is presently 26%.  Addressing, NABARD Kisan Samaroh in presence of Chief Minister Yogi Adityanath at Deen Dayal Upadhyay, University Thorat said, “Maharashtra FPCs success has four dimensions i.e. organised small & marginal farmers ;  business models of value addition at village level; Employment generation in value chain  and Bringing Investment in the sector. As a result FPCs in the state are showing good performance in the country.” He congratulated the CM Yogi Adityanath for keeping FPOs at the Center stage in agriculture marketing reforms and further requested him to delink Market Cess from the APMC for promoting investment in Agriculture Marketing. He further said, “F...

पीपीपी- आयएडी कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निविदा सूचना जाहीर

Image
पुणे, २० कांदा साठवणूक ( १००० मे. टन ) व पणन सुविधा ( ग्रेडिंग शेड व ५० टन वजनकाटा ) उभारणीसाठी महा ओनियन ( नाफेड- महाएफपीसी संयुक्त भागीदारी प्रकल्प )  मार्फत निविदा मागविल्या असून कागदपत्रे निविदा कागदपत्रे  http://www.mahafpc.org/Tender_Document.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. सामायिक सुविधा शेड,  कांदा साठवणूक चाळ बॉक्स व वजनकाटा या तिन्ही घटकांसाठी एकत्रिपणे किंवा स्वतंत्रपणे निविदा भरू शकतात. तसेच अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांतील १६ शेतकरी कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर प्रकल्प उभारणीसाठी तीन क्लस्टर करण्यात आले असून कंत्राटदार किमान एक किंवा अधिक क्लस्टर साठी निविदा भरू शकतो. इच्छुक पात्र संस्थांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २७.१२. २०१९ पर्यंत  महाएफपीसी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून निविदा सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी ०२०-२४२७२८२७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. 

संस्थांच्या बळकटीकरणासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्ये आवश्यक : महाएफपीसी

Image
पुणे, १३ डिसें. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेमध्ये सुरु असणाऱ्या सहकार कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी कंपनी प्रशिक्षण दरम्यान महाएफपीसीच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि संस्थांच्या बळकटीकरणासाठी  व व्यवसाय वृद्धीसाठी कौशल्ये आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. 

लातूरमधील कंपन्याचे डिसें. अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य.

Image
लातूर, १२ डिसें. लातूर मधील हमीभाव खरेदी केंद्रे सुरु केलेल्या १४ शेतकरी कंपन्यांची लातूर येथे बैठक पार पडली असून सध्या सोयाबीनचे बाजारभाव हमीभापेक्षा अधिक असल्याने कंपन्यांनी बाजारभावाने सोयाबीन खरेदी करून प्रक्रियादारांना पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबर अखेरीस ८००० क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.