शेतकरी कंपन्यांमार्फत भागधारक शेतकऱ्यांच्या हमीभाव खरेदी साठी नोंदणी सुरू

वाशीम , २० मार्च : रमेश जिजेबा गायकवाड या बाळनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. बाळ खेड (ता.रिसोड) च्या भागधारक शेतकऱ्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत होणाऱ्या हमीभाव खरेदीसाठी प्रथम नोंदणी करणारा शेतकरी म्हणून बहुमान पटकाविला आहे. आजपासून महाएफपीसी या राज्य अभिकर्ता संस्थेच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर हरभरा हमीभाव खरेदी साठी नोंदणी सुरू झाली आहे. महाएफपीसी मार्फत होणारी खरेदी ही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासद शेतकऱ्यांसाठी होणार आहे. त्यामुळे बिगर सभासद शेतकऱ्यांना शेतकरी कंपनीचे भागधारक असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एफ ए क्यू दर्जाचा शेतमाल तयार करून देण्यासाठी कंपनी स्तरावर धान्य स्वच्छता व प्रतवारी सुविधा उपलब्ध असणार आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमाल ' प्रथम नोंदणी प्रथम संधी' (FIFO) या तत्वाने खरेदी साठी कंपनी यार्डावर बोलाविण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती एस एम एस द्वारे दिली जाणार आहे. तसेच खरेदी ही सदर विभागासाठी कृषी विभागाने निर्धारित केलेल्या उत्पादकतेनुसार होणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ऑनलाईन ...