शेतकरी कंपन्यांना उद्योग विभाग पाठबळ देणार : सुभाष देसाई
करमाड, ता. ५ जानेवारी : शेती विकासासाठी शेतकरी उत्पादक
कंपन्या एक आशेचा किरण असून या संस्थांना राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत पाठबळ देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करमाड (औरंगाबाद) येथे झालेल्या शेतकरी उत्पादक
कंपन्यांच्या एकदिवसीय कार्यशाळेत केले.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी
संघटीत होत आहेत हि अत्यंत समाधानाची बाब आहे. या संघटनाच्या द्वारे मूल्यवर्धन
करून बाजारपेठ काबीज करणे आवश्यक आहे. या कंपन्यांना एमआयडीसी मध्ये जागा उपलब्ध
करून देणे हि एक सुरुवात आहे.व भविष्यात आपण केवळ शासनाच्याच नव्हे तर वैयक्तिक
पातळीवर देखील शेतकरी कंपन्यांचे प्रश्न सोडविणार आहे.
यावेळी कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शेतकरी उत्पादक
कंपन्यांच्या संधी व आव्हाने तसेच नवीन औद्योगिक धोरणाकडून असणाऱ्या अपेक्षा यावर
कंपनी प्रतिनिधींनी आपली मते मांडली. दुसऱ्या सत्रात श्री. योगेश थोरात, श्री. संजय काटकर, श्री. संजय निर्मळ, स्मिता लेले, श्री.श्रीकृष्ण गांगुर्डे, श्री. विलास
शिंदे व एमआयडीसी चे सीईओ डॉ. पी अन्बलगन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Comments
Post a Comment