शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत लातूर, उस्मानाबाद येथे सोयाबीन खरेदी सुरु
लातूर ,ता. १७ : महाएफपीसी च्या माध्यमातून प्रोडक्टिव्ह अलायन्स
(Productive Alliance ) चा प्रयोग राबवत शेतकरी उत्पादक
कंपन्या व प्रक्रियादार यांच्यात समन्वय साधून शेतमालाची खरेदी व विक्री सुरू झाली
आहे. सोयाबीन प्रक्रियेमध्ये अग्रेसर असणाऱ्या एडीएम कंपनीने शेतकरी उत्पादक
कंपन्यांना सोयाबीन पुरवठा करण्यासाठी संधी दिली आहे.
उस्मानाबाद मधील अजिंक्य ऍग्रो , एन एन जी ऍग्रो ,
अभिनव विकसित तर लातूर मधील एस. पी.
कृषी मित्र या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी साधारणपणे ४५ मे . टन सोयाबीन चे सौदे केले आहेत.
Comments
Post a Comment