Posts

Showing posts from October, 2018

शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत लातूर, उस्मानाबाद येथे सोयाबीन खरेदी सुरु

Image
लातूर , ता. १७ : महाएफपीसी च्या माध्यमातून प्रोडक्टिव्ह अलायन्स   (Productive  Alliance ) चा प्रयोग राबवत शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रक्रियादार यांच्यात समन्वय साधून शेतमालाची खरेदी व विक्री सुरू झाली आहे. सोयाबीन प्रक्रियेमध्ये अग्रेसर असणाऱ्या एडीएम कंपनीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोयाबीन पुरवठा करण्यासाठी संधी दिली आहे.   उस्मानाबाद मधील अजिंक्य ऍग्रो , एन एन जी ऍग्रो , अभिनव विकसित तर लातूर मधील   एस. पी. कृषी मित्र या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी साधारणपणे ४५ मे . टन   सोयाबीन चे सौदे केले आहेत.    शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांचा वाहतूक व   इतर   खर्च कमी होणार आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या केंद्रांचा फायदा घ्यावा. असे आवाहन कंपन्यांच्या     वतीने करण्यात येत आहे.  

महाएफपीसी च्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील योगेश थोरात यांचे भाषण

Image